Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

UPSC | पुण्याच्या मोक्ष राणावतने इतिहास रचला!

गरुडभरारी: पुण्यातील २५ वर्षीय मोक्षला यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत २५१ वी रँकिंग

पुणे | पुण्यातील २५ वर्षीय मोक्ष दिलीप राणावत याने २०२४ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतात २५१ वा क्रमांक मिळवून उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे.

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे याच प्रमाणे मोक्ष याची हुशारी कालवणातच स्पष्ट दिसून येत होती त्यामुळे कुटुंबाने मोक्षेला त्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये पूर्णतः पाठिंबा दिला त्याच्या आवडीनिवडी जोपासत त्याला प्रोत्साहन दिले मोक्ष याच्या बहिणीने सुद्धा आयआरएस बनून नाव उंचावले होते आणि आता मोक्षने आयपीएस बनून संपूर्ण जैन समुदायाला अभिमानाने गौरवले आहे. असे मोक्ष यांचे पितादिलीप मगरराजजी राणावत मोठ्या अभिमानाने सांगतात.

हेही वाचा    :    रहाटणीत ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

राणावत कुटुंबीय मूळचे हरियाणा राज्यातील दुजाना गावचे. जैन परिवारातून येणारे राणावत कुटुंबीय भारतात सहभागी ला निघून गेले आहेत. 251 वी आयपीएस रँक मिळवून, मोक्षने केवळ दुजाना गावाचेच नव्हे तर संपूर्ण मुंबई, पुणे आणि संपूर्ण भारतातील जैन समुदायाचे नाव उंचावले आहे असे मोक्षचे काका दिनेश राणावत यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

कठोर परिश्रम निश्चितच फळ देतात. माझ्या यशामध्ये माझे कुटुंबीय, सहकारी मित्र, शिक्षक या सर्वांचेच योगदान आहे. परिश्रम घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच मी माझ्या यशाबद्दल सांगू शकतो.

– मोक्ष राणावत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button