Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात नामांतरावरून आक्षेपार्ह बॅनरबाजी, मेधा कुलकर्णी भावूक; म्हणाल्या “टीका करा, पण काहीतरी पातळी ठेवा”

Medha Kulkarni : पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत बाजीराव पेशवे हे नाव देण्याची मागणी भाजप खासदार प्रा. डॅा. मेधा कुलकर्णी यांनी केली होती. या मागणीवरून वाद निर्माण झाला असून, पुण्यातील बालगंधर्व चौकत आक्षेपार्ह बॅनरबाजी करण्यात आली आहे. बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरवरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त करत ‘टीका करा, पण काहीतरी पातळी ठेवा’ असे म्हटले आहे. तसेच पत्रकार परिषदेत त्या भावूक झाल्या होत्या.

स्थानकाच्या नामकरणावरून केले जात असलेले राजकारण निंदनीय आहे. बाजीराव पेशव्यांनी २८ लढाया लढल्या. मस्तानी यादेखील योद्धा होत्या. त्यांचा आंतरधर्मीय विवाह होता. त्यामुळे त्यांच्या नावाचा बुधवार पेठेशी संबंध जोडणे हे खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचे कुलकर्णी यावेळी  बोलताना म्हणाल्या. तसेच संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेतून त्यांनी देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले पुणे सध्या राहण्यायोग्य राहिलेले नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा –  देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती करण्याचा ‘तो’ अहवाल..”

खासदार कुलकर्णी यांनी पुणे शहरातील नागरी समस्यांवर भाष्य केले. यामध्ये पुण्यातील वाहतूक कोंडी या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले. शहराच्या सर्वच भागांत रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होते. विकास आराखडा तयार केला जातो, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. वाढत्या वाहतूक कोडींमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button