Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘पुण्यात सर्किट बेंच होण्यास हरकत नाही’; सरन्यायाधीश भूषण गवई

पुणे : कोल्हापूरप्रमाणेच पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किंट बेंच होण्यास हरकरत नाही, अशा भावना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या आहेत.

येथील वकील आता खंडपीठाचा लढा निर्णायक पातळीवर लढत आहेत. पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. रवींद्र शिंदे, अ‍ॅड. पंकज महाजन, अ‍ॅड. अरविंद आव्हाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  एअर इंडिया विमान अपघातानंतर ११२ पायलट अचानक गेले सुट्टीवर; मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती

चर्चेनंतर गवई पुणे येथील खंडपीठासाठी सकारात्मक असल्याचे दिसून आले. कोल्हापूरप्रमाणेच पुणे येथेसुद्धा सर्किट बेंच स्थापनेस कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याच्या न्याय हक्कासाठीचा हा लढा आम्ही अंतिम विजय मिळवूनच थांबणार, असे मत पुणे बारचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button