ग्राहकांच्या सुरक्षेसाठी माय एमएनजीएल ॲप

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएलने अधिकृत माय एमएनजीएल मोबाइल ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासह सर्व गॅस सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.
अलीकडे एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असून, त्यावर आळा घालण्यासाठी हे ॲप एक सुरक्षित, अधिकृत आणि वापरण्यास सुलभ असा उपाय ठरणार आहे.
हेही वाचा – “इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हा कोणता विचार?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
फसवणुकीच्या घटना थांबाव्यात म्हणून एमएनजीएलने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्या योजना एसएमएसद्वारे आणि सोशल मीडियावर देखील शेअर केलेल्या आहेत.
तरीही, काही ग्राहक फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे एमएनजीएलने आपली जनजागृती अधिक तीव्र करत, माय एमएनजीएल नावाचा एक पूर्णतः सुरक्षित आणि विश्वासार्ह ॲप ग्राहकांच्या सेवेत आणला आहे.