Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिका राबविणार स्वच्छ पुणे अभियान; महापालिका आयुक्तांचा पुढाकार

पुणे : पुणे महानगरपालिका स्वच्छ पुणे अभियान राबविण्याच्या दृष्टीने आता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने व्यापक जनजागृती करणार आहे. नागरिकांचा सक्रीय सहभाग वाढवून शहरात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेतली.

नवनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन (ज), पृथ्वीराज बी.पी. (इ), ओमप्रकाश दिवटे (वि), तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम उपस्थित होते.

या अभियानांतर्गत शहरातील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण १०० टक्के करणे, होम कंपोस्टिंग वाढवणे, बल्क वेस्ट जनरेटर्समार्फत कचरा प्रक्रिया, वस्ती पातळीवर जनजागृती करणे, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, दृश्यमान स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

हेही वाचा –  ‘महाबळेश्वरमध्ये आता स्ट्रॉबेरीवरही संशोधन’; माणिकराव कोकाटे

बैठकीस या बैठकीस रोटरी क्लब, इकोएक्झिस्ट, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, पुणे रिटेल असोसिएशन, व्यापारी संघ, मराठा चेंबर आॅफ काॅमर्स , पुणेरी नायक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनएससीसी , यार्दी, पुनरावर्तन, क्रेडाई, ज्वेलर्स असोसिएशन, लोढा फूड प्रॉडक्ट डिलर्स अशा वेगवेगळया संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी शहराच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा सहभाग वाढवण्याचे महापालिका नियोजन करणार आहे. या मोहिमेस सर्व स्तरांतून सहकार्य मिळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राम यांनी सर्व उपस्थितांना केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button