पाटी-पुस्तकपुणे

जिल्हा कराटे स्पर्धेत एफ.ई. विद्यार्थिनीचे घवघवीत यश

शिक्षण विश्व: उन्नती फडतरे हिची जिल्हा कराटे स्पर्धेत कामगिरी

वराळे–तळेगाव : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे–तळेगाव, पुणे येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी (एफ.ई.) मधील विद्यार्थिनी कु. उन्नती फडतरे हिने जिल्हा कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या स्पर्धेत उन्नतीने आपल्या उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या जोरावर अंडर-२१ वर्षे महिला कुमिते तसेच सिनिअर महिला कुमिते या दोन गटांत सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या या घवघवीत यशामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरेला आणखी बळ मिळाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कु. उन्नती फडतरेची २०२६ साली नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही बाब संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

हेही वाचा –  प्रचाराच्या रणधुमाळीत विराज लांडे यांचा वाढदिवस उत्साहात

या यशाबद्दल संस्थेचे मा. डॉ. सुशांत पाटील व मा. अ‍ॅड. अनुजा पाटील यांनी उन्नतीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. सुरेश शिरभदुरकर, डीन अकॅडेमिक्स डॉ. योगेश गुरव, रजिस्ट्रार श्री. वेटाळे आणि सर्व विभागप्रमुखांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले.

डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस परिवाराकडून कु. उन्नती फडतरेला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, ती राज्य व राष्ट्रीय स्तरावर अधिक यश संपादन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button