पोलीस दलात लवकरच मोठे बदल?; आयुक्तालयाने सादर केला शासनाला प्रस्ताव

पुणेः शहरातील वाढती गुन्हेगारी चितेंचा विषय बनली आहे. स्वारगेट प्रकरणानंतर पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिला आहे का नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. तसेच गुन्हेगारांनाकडून दहशत माजवण्याचे प्रकार घडत असतात. चोरी, मारहाणी, दहशत माजवणारे व्हिडिओ, खून आदी गुन्हे घडतच असतात. यामुळेच पुणे पोलीस दलात आगामी काळात मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ उपुरे पडत आहे. तसेच शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सहा नवीन पोलीस उपायुक्तांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आयुक्तालयाकडे पाठण्यात आला आहे.
हेही वाचा – खासदार सुनेत्रा पवार यांची पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक भेट; आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक अन् चर्चा
या प्रस्तावामध्ये वाढत्या सायबर क्राईमच्या घटनांमुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाटी शहरात दोन नवीन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मितीची करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य सरकाराने हिरवा कंदील दिल्यानंतर शहरातील वाहतूक नियंत्रण, गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनुष्यबळ अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक शाखेसाठी एक स्वतंत्र अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सहा पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही फसवणूक अॅानलाईनव पद्धतीने केली जात आहे. काही घटनांमध्ये तर असे गुन्हे करणारे गुन्हेगार नव्या युक्त्या वापरत नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक करत आहेत. यामुळे शहरातील पूर्व आणि पश्चिम विभागानुसार दोन स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.