Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भूसंपादनासाठी १४ अभियंत्यांची समिती गठीत

पुणे : महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग येणार आहे. या कामासाठी महापालिकेला अद्याप यश आले नसल्याने, आता उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली १४ अभियंत्यांची समिती गठित करण्यात आली आहे.

ही समिती परिसरातील जागा मालक आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, बांधकाम विभाग आणि भवन रचना विभागातील १२ उप अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे.

महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा स्मारक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रितपणे विकास करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यासाठी आरक्षण बदलण्याचा निर्णय होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

मात्र, महापालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली नव्हती त्याच वेळी शासनाकडून २०० कोटींचा निधी मंजूर करूनही हे काम होत नसल्याचे शासनाकडूनच याबाबत थेट नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अखेर महापालिकेने समिती नेमत या कामास गती दिली आहे.

हेही वाचा –  ‘वेळ आलीयं, एकत्र येण्याची’, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोस्ट चर्चेत

या दोन्ही स्मारकांचे एकत्रिकरण करताना सुमारे ५ हजार ३१० चौरस मीटरची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा एकूण ९१ मिळकती असून, ५१६ मालक आणि २८५ भाडेकरू आहेत. प्रशासनाला या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

या कामात बराच विलंब झाल्याने आता या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वेक्षण केले जाणार आहे. जागा मालकांशी संवाद साधून त्यांना जागेचा मोबदला कोणत्या स्वरूपात हवा आहे, याची नोंद घेतली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी महापालिकेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

ही असेल समितीची जबाबदारी

– भूसंपादनासाठीचे फेर सर्वेक्षण करणे.

– विस्थापितांच्या बैठका घेऊन त्यांचे समुपदेशन करणे.

– जागा मालकांना एफएसआय , टीडीआर, रोख रक्कम यापैकी कोणत्या स्वरूपात मोबदला हवा , याची माहिती संकलित करणे.

– या बाबतचे प्रस्ताव स्थायी समिती, मुख्यसभेत सादर करणे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button