breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना वेळेत योग्य उपचार व आरोग्य सुविधा द्या – सचिन चिखले

  • नागरिकांच्या तक्रारींची मनसेने घेतली दखल
  • आरोग्य प्रशासनासोबत बैठक घेऊन केली चर्चा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना जम्बो कोविड सेंटरमध्ये योग्य प्रकारे उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मनसे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी तात्काळ या सेंटरला भेट देऊन अधिका-यांची बैठक घेतली. सुविधांबाबत कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही. रुग्णांना वेळेत योग्य उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशी सूचना चिखले यांनी तेथील अधिका-यांना दिल्या.

जम्बो कोविड सेंटरमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, डॉ. प्रीती मॅडम, किरण बोरुडे यांची बैठक घेतली. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा, आरोग्य कर्मचारी वाढवणे, रुग्णांना योग्य तो आहार या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. योग्य ते उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुण जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांची कोणतीही तक्रार आली नाही पाहिजे. त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासह आरोग्य सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत, अशा सूचना देखील चिखले यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, उपशहराध्यक्ष राजू सावळे, पिंपरी विभागाध्यक्ष दत्ता देवतरासे, वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, उपविभाग अध्यक्ष सचिन मिरपगार, अनिल बहिरवाडे, रोहित काळभोर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button