Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राजीनामा दिल्यानंतरही माज उतरलेला नाही; विजय वडेट्टीवार यांची रुपाली चाकणकरांवर टीका

मुंबई | कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरात यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप असून या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खरातसोबत चाकणकर यांचे काही फोटोही चर्चेत आले आहेत. या सर्व घडामोडींनंतर शुक्रवारी उशिरा रात्री चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

राजीनाम्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “खरातचे हे दुसरे रूप मला माहित नव्हते. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.” त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. तसेच “मी माझे कोणतेही बोट कापलेले नाही. सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा      :              सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांना “राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा” अशी टीका केली. त्यांनी म्हटले की, “रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला, मात्र राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. स्वेच्छेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात महिलांवर व पत्रकारांवर टाकलेला दबाव, तसेच पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेल्या प्रयत्नांचा कुठलाही खेद त्यांना वाटत नाही.”

“रुपाली चाकणकर हा केवळ छोटा मासा आहे. या प्रकरणात आणखी कोणते मंत्री किंवा नेते सहभागी होते, कोणी खरातला राजाश्रय दिला, याची सखोल चौकशी होऊन सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.” असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button