Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

To The Point : भाजपामध्ये संधीसाधुपणाला ‘मार्केट’ अन्‌ शहराध्यक्ष शंकर जगताप ‘टार्गेट’

महाविकास आघाडीत प्रवेश सोपा करण्यासाठी ‘ब्लेम गेम’ : जगताप कुटुंब एकसंघच, पण नसलेला वाद उफाळून काढण्याचा प्रयत्न 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील मातब्बर घराणे जगताप कुटुंबियांमधील कथित वादाचे भांडवल करुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील प्रवेश सुलभ करण्यासाठी भाजपामधील काही माजी नगरसेवकांकडून ‘ब्लेम गेम’ सुरू झाला आहे. त्यासाठी जगताप कुटुंबामध्ये नसलेला वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेकरिता मार्च-२०२२ मध्ये पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. तसे आवाहनही पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले होते. मात्र, चिंचवडमधील भाजपाच्या माजी नगसेवकांमधील एका गटाच्या अट्टाहासामुळे ही निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना तिकीट पक्षश्रेष्ठींकडून मिळेल, असे ठरले होते. पण, कौटुंबिक वाद कौटुंबिक पातळीवर मिटवत शंकर जगताप यांनी एबी- फॉर्म अश्विनी जगताप यांच्या नावाने भरला. त्यावेळी झालेली अतितटीची निवडून शंकर जगताप यांनी जिंकून आणली. अन्यथा कसबा मतदार संघाप्रमाणे भाजपाला ही जागा गमवावी लागली असती, ही वस्तुस्थिती आहे. 

भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना शंकर जगताप यांनी जुने-नवे असा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिमहत्त्वाकांक्षी नेत्यांचा अपेक्षांची पूर्तता करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे शहराध्यक्ष झाल्यापासूनच त्यांच्याविरोधात राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या कुरखोडींना आणखीच जोर चढला. 

विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यामध्ये राजकीय सत्तासंघर्ष नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांना भाजपाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. शंकर जगताप आमदार झाल्यास आगामी २० वर्षे राजकीय महत्त्वाकांक्षी नेत्यांनी संधी मिळणार नाही. कारण, उत्तम व्यवस्थापन कौशल्य आणि राजकीय डावपेच याची जाण असलेले शंकर जगताप त्यांचे राजकीय गुरू दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या तालमीत तयार झाले आहेत. 

पद वाटपात शंकर जगताप यांचा ‘रोल’च नव्हता…

‘‘भाजपाच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या पदांवर संधी दिली नाही. पक्षात शहराध्यक्षांची मनमानी कारभार सुरू आहे. आम्ही पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. पण, पक्षश्रेष्ठींपर्यंत आमची ओळख नाही…’’ असे अनेक आरोप आजच्या घडीला भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी नगरसेवकांकडून केले जात आहेत. मात्र, भाजपाची सत्ता २०१७ ते २०२२ या काळात होती. त्या काळात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पदवाटपाबाबत निर्णय घेत होते. त्यांच्या निधनानंतर शंकर जगताप शहराध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे महापालिकेतील महत्त्वाची पदे दिली नाहीत, असे म्हणणे व्यवहार्य नाही. दुसरीकडे, आम्ही दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहोत, पण शंकर जगताप यांना मानत नाही, असे म्हणणेही परस्पर विरोधी आहे. कारण, लक्ष्मण जगताप यांनी भाजपाचे तिकीट दिले नसते, तर अनेकांना महापालिका सभागृहात संधीच मिळाली नसती, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. 

प्रसारमाध्यमांमध्ये ‘स्पेस’ मिळवण्याचा प्रयत्न…

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ज्या लक्ष्मण जगताप यांनी काही लोकांना ताकद दिली. राजकारण आणि व्यावसायात स्थिरस्थावर केले. नगरसेवक बनवले. शक्य त्यांना पदे दिली. स्वत:च्या भावाप्रमाणे वागवले. ते लक्ष्मण जगताप शेवटच्या घटका मोजत असताना काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात होते. त्यावेळीपासून संबंधित राजकीय महत्त्वाकांक्षी लोकांकडून शंकर जगताप यांना ‘टार्गेट’ केले आहे. शंकर जगताप शहराध्यक्ष नसते, तर कदाचित आमदार अश्विनी जगताप यांच्यावरही आक्षेप घेतला असता. ज्या लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला जगताप कुटुंब अभेद्य असल्याचे लक्षात आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या लोकांकडून ‘‘मी लक्ष्मणऊंचा समर्थक आहे’’ असा दावा केवळ भाजपा आणि शंकर जगताप यांना ‘डॅमेज’ करण्यासाठी केला जातो आहे. त्याद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये ‘स्पेस’ मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. वास्तविक, शंकर जगताप यांनी त्या-त्या प्रभागामध्ये नवोदित ‘पर्याय’ तयार केले आहेत. त्यामुळे काही मान्यवरांची अस्वस्थता वाढली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button