Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
भाजपाकडून तिसरी यादी जाहीर, २५ जणांच्या नावांची घोषणा!

मुंबई | आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं तिसरी यादी जाहीर केली आहे. पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी २५ उमेदवारांची जाहीर केली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून १४६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
तिसऱ्या यादीतील मतदारसंघ आणि उमेदवार :
- मुर्तिजापूर : हरीश पिंपळे
- कारंजा : सई डहाके
- तिवसा : राजेश वानखडे
- मोर्शी : उमेश यावलकर
- आर्वी : सुमित वानखेडे
- काटोल : चरणसिंह ठाकूर
- सावनेर : आशिष देशमुख
- नागपूर मध्य : प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम : सुधाकर कोहळे
- नागपूर उत्तर : मिलिंद माने
- साकोली : अविनाश ब्राम्हणकर
- चंद्रपूर : किशोर जोरगेवार
- आर्णी : राजू तोडसाम
- उमरखेड : किशन वाखेडे
- देगलुर : जितेश अंतापूरकर
- डहाणू : विनोद मेढा
- वसई : स्नेहा डुबे
- बोरिवली : संजय उपाध्याय
- वर्सोवा : भारती लव्हेकर
- घाटकोपर : पराग शाह
- आष्टी : सुरेश धस
- लातूर : अर्चना चाकुरकर
- माळशिरस : राम सातपुते
- कराड उत्तर : मनोज घोरपडे
- पळुस कडेगाव : संग्राम देशमुख





