Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

To The Point | दोन दादांची शर्यत… आणि पुणे-पिंपरीच्या प्रश्नांना चालना!

महेशदादा विरुद्ध अजितदादा: विकासाच्या रेषेवर राजकीय स्पर्धा तीव्र

पुणे | पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी

पुणे-पिंपरी-चिंचवडच्या विकासात एक नवा राजकीय ट्रेंड उगम पावत आहे -“महेशदादा बोलले की अजितदादा तातडीने चालतात!” हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरू झालेली हालचाल आता दोन दिग्गज नेत्यांमधील कार्यशक्तीच्या शर्यतीत रूपांतरित झाली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत जर विकासकामांच्या मुद्यावरच महेशदादा विरुद्ध अजितदादा अशी थेट लढत झाली, तर गेल्या 10 वर्षांतील भाजपाच्या कार्यक्षमतेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा दावा अधिक मजबूत वाटतो. मात्र या स्पर्धेचा सर्वात मोठा लाभ पुणे-पिंपरी-चिंचवडच्या जनतेला होतोय हे मात्र निर्विवाद आहे. एक दादा मी समस्या सोडवू शकतो असा विश्वास देतो, दुसरा लगेच सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी पोहोचतो… राजकारण असो वा स्पर्धा, शेवटी प्रश्न मार्गी लागत असतील, तर ही ‘दादांची शर्यत’ स्वागतार्हच म्हणावी लागेल.

महेश लांडगेंचा पहिला डाव:

10 जुलै 2025 रोजी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हिंजवडी आणि चाकणमधील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर सखोल चर्चा घडवून आणली. यावेळी विभागीय आयुक्तांना “सिंगल पॉईंट ॲथॅरिटी” म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महेशदादांनी लगेच विभागीय आयुक्तांसोबत पुढील बैठक घेतली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली.

हेही वाचा      :        ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली’; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट 

अजित पवारांचा ‘सकाळी सहाची’ रणनीती:

याच हालचालीतून भाजपाला राजकीय श्रेय मिळू लागेल या भीतीने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 26 जुलैच्या पहाटेच हिंजवडीत दाखल झाले. आयटी पार्कमधील प्रश्नांवर स्वतः मैदानात उतरून आढावा घेतला. योगायोग असा की, त्याच दिवशी सकाळीच महेश लांडगे चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योग संघटनांशी बैठकीस बसले होते!

चाकणच्या दिशेने पुढची चाल:

महेश लांडगे यांच्या पुढाकाराने 30 जुलै 2025 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला “सिंगल पॉईंट कोऑर्डिनेटर” म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली.

पुन्हा अजितदादा… पुन्हा सकाळी सहाची एन्ट्री!

महेश लांडगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत 8 ऑगस्ट 2025 रोजी, अजित पवार पुन्हा चाकणमध्ये पहाटे 6 वाजता दाखल झाले. PMRDA च्या कार्यालयात बैठक घेऊन आपणही यामध्ये सक्रिय असल्याचा संदेश दिला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील समस्या सोडवायच्या असतील, तर महेश लांडगेंना भेटा…त्यांना कामाला लावा… म्हणजे अजित पवार स्वत: ॲक्टीव्ह होतील आणि वर्षानुवर्षे त्यांच्याच सत्ताकाळात प्रलंबित असलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल, अशी चर्चा सर्वसमान्य नागरिकांमध्ये होवू लागली आहे.

एक कार्यक्रम, दोन संकेत आणि ‘उडता तीर’:

एका सार्वजनिक कार्यक्रमात महेश लांडगे यांनी अजितदादांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा किस्सा घडला होता. विकासकामांचे श्रेय भाजपा आणि फडणवीस यांना महेश लांडगेंनी जाहीरपणे दिले. मात्र, भाषणाच्या उत्तरार्धात अजित पवार यांनी ‘उडता तीर’ पकडला आणि म्हणाले, “महेशला माझं नाव घ्यायला काय अडचण आहे माहिती नाही! आम्हीसुद्धा विकास केला आहे”. अशी खंत व्यक्त करताना अजितदादांची बॉडी लॅंग्वेज पुणे-पिंपरी परिसरात भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना राजकीय असुरक्षितता जाणवते, हे अधोरेखित होते. भाजपा आणि सीएम फडणवीस यांनी महेश लांडगेंना प्रचंड ताकद दिली आहे. त्यामुळे त्यांनी आपले कार्यक्षेत्र ‘‘पुणे रिजन’’ निश्चित केले आहे, असे स्पष्ट दिसते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button