Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर “संकल्प सप्ताह” प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध, तपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

या मोहिमेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सप्ताहात विविध विषयांवर आधारित उपक्रम राबविले जाणार असून, नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आठवडाभर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

सप्ताहातील प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे :

थॅलेसेमिया सप्ताह – १ मे ते ८ मे, 2026

१ मे – संकल्प व थॅलेसेमिया सप्ताहाचे उद्घाटन

Theme: Commitment to Prevention

Action Point

राज्य/जिल्हा स्तरावर संकल्प दिवस साजरा करणे

सर्व आरोग्य संस्थांमध्ये थॅलेसेमिया निर्मुलनाची शपथ घेणे

जिल्हा/राज्य स्तरावर मोहिमेचे उद्घाटन

प्रेस कॉन्फरन्स / मीडिया ब्रीफिंग

सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करणे

Digital campaign launch (Reels, Short videos)

हेही वाचा –  जनगणना २०२७ मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

२ मे – शाळा व महाविद्यालय जनजागृती दिवस

Theme: “Test Before Marriage”

कॉलेजमध्ये व्याख्याने घेणे

पोस्टर, निबंध स्पर्धा आयोजित करणे

“Carrier म्हणजे काय?” यावर सोपी माहिती सांगणे

युवकांमध्ये premarital screening ची गरज समजावणे

Real-life case stories (emotional connect) आयोजित करणे

३ मे – आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण दिवस

Theme: Capacity Building

ASHA, ANM, MPWयांचे थॅलेसेमिया व इतर हिमोग्लोबीनोपॅथी आजारांबाबत प्रशिक्षण घेणे

Early detection, counselling techniquesबाबत मार्गदर्शन करणे

Field-level reportingव follow-up system कार्यान्वित करणे

४ मे – गर्भवती महिला व कुटुंब सल्ला दिवस

Theme: Healthy Future Generation

ANCक्लिनिकमध्ये तपासणी व समुपदेशन

High-risk couples listतयार करणे

High-risk couplesसाठी genetic counselling चे नियोजन करणे

“Healthy child planning” बद्दल मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे

५ मे – रुग्ण सहाय्य व रक्तदान दिवस

Theme: Care for Existing Patients

Thalassemiaरुग्णांसाठी Blood Donation Camp चे आयोजन करणे

NGO/Trustयांच्या सहकार्याने रुग्ण व पालकांसोबत संवाद सत्रांचे आयोजन करणे.

Free medicines / support kits distributionचे आयोजन करणे

६ मे – तपासणी (Screening) दिवस

Theme: ‘Know Your Status’

प्रत्येक जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / स्त्री रुग्णालय / प्रा.आ. केंद्र/ उप केंद्र/ आपला दवाखाना /HBT दवाखाने मध्ये screening camp आयोजित करणे

Hb electrophoresis / CBCतपासणी शिबिरांचे आयोजन करणे

विशेषतः १८–३५ वयोगट

लग्न ठरलेले जोडपे यांची प्राधान्याने तपासणी करणे

“डे-केअर सेंटर” मार्फत थॅलेसेमिया,हिमोफिलिया व सिकलसेल ॲनिमिया या तिन्ही आजारांच्या रुग्णांवर निदान, उपचार व प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी एक सामाईक “डे-केअर सेंटर” द्वारे आरोग्य सुविधा पुरविणे.*

७ मे – जनजागृती रॅली व मीडिया दिवस

Theme: Mass Awareness Movement

सकाळच्या सत्रामध्ये थॅलेसेमिया व इतर हिमोग्लोबीनोपॅथी आजारांबाबत जनजागृती करिता जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रॅली / प्रभात फेरीचे आयोजन करणे

रेडिओ,टीव्ही, सोशल मीडियांवर प्रचार प्रसार करणे

स्थानिक नेते/सेलिब्रिटी यांचा सहभाग वाढविणे

८ मे – *जागतिक थॅलेसेमिया दिवस*

Theme: Hidden No More : Finding The Undiagnosed, Supporting The Unseen

World Thalassemia Dayनिमित्त सकाळच्या सत्रात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे नियोजन करणे. या कार्यक्रमाकरिता सर्व जिल्ह्यांना VC द्वारे कनेक्ट करणे

उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार – डॉक्टर,कर्मचारी, NGO, रुग्ण व पालक यांच्या सत्कारांचे नियोजन करणे

पुढील वर्षासाठी रोडमॅप जाहीर करणे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button