Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

धक्कादायक: छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवले; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर चक्क वाहन पार्किंगच्या जागेत उतरवण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. हेलिपॅड असल्याच्या समजातून पायलटने हेलिकॉप्टर वाहनांसाठी असलेल्या पार्किंगच्या जागेत उतरवल्याची माहिती आहे. या प्रकाराबाबत बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, या बाबत तत्काळ चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील खानवडी या महात्मा फुले यांच्या जन्मगावी ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ट कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, अधिकारी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी भुजबळ हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे ती जागा हेच हेलिपॅड असल्याचा समज होऊन पायलटने तिथे हेलिकॉप्टर उतरवले. भुजबळ हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे पार्किंगमध्ये उतरवलेले हेलिकॉप्टर हे मूळ हेलिपॅडकडे नेण्यात आले.

हेही वाचा –  IPL 2026: चेन्नई सुपर किंग्ससाठी गुडन्यूज! एम एस धोनीच्या पुनरागमनाचा दिवस ठरला, तारीख नोट करून ठेवा

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांना भुजबळ यांचे हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरल्याबाबत विचारण्यात आले. ‘मला याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, या बाबत तत्काळ चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली.

छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल ही अपेक्षा, असे पवार यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button