Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’; पुण्यात लागले फ्लेक्स

पुणे | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय नेते बैठका, मेळावे आणि रॅलीच आयोजन करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहेत. या फ्लेक्स राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा सुरू आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने माजी स्थायी समिती अध्यक्षा आश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल हे अनेक महिन्यापांसून विधानसभेची तयारी करत आहेत. या मतदारसंघातून ३० वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहे. आबा बागूल यांनी २००९ पासून काँग्रेस श्रेष्ठीकडे पक्षाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी मागणी करित आले. पण प्रत्येक वेळी आबा बागुल यांना डावलण्यात आले. तर यंदा हा मतदारसंघ शरद पवार गटाला गेला. त्यामुळे आबा बागूल हे नाराज झाले. त्यावर त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा    –      राज्यात पुन्हा संधी मिळाली तर आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ तारखेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या तरी तिरंगी लढत म्हणावी लागेल, काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी आबा बागूल यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button