Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा सवाल

मुंबई | अजित पवार यांचा विमान अपघात २८ जानेवारीला झाला आणि महाराष्ट्राने लोकनेता गमावला. कारण या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. २९ जानेवारीला बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राने लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप दिला. मात्र या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने तपास प्रक्रियेवर शंका उपस्थित करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान आता रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट लिहून अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो जळाल्याचं का सांगितलं? असा सवाल केला आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत. VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे.

हेही वाचा       :              ‘बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी घेण्यात आला. त्यामुळे त्यात चुका होणं अपेक्षित नाही. तरीही या अहवालात बारामतीचा उल्लेख जिल्हा असा करण्यात आला आहे. बारामती नगरपरिषदेला महानगरपालिका म्हटलं आहे. त्यामुळे अहवाल गांभीर्याने बनवण्यात आला का? हा प्रश्न उरतो आहे असं रोहित पवार म्हणाले.

तसंच विमान उजव्या बाजूला झुकलं असं म्हटलं गेलं आहे पण विमान डाव्या बाजूला झुकलं असं या AIB ने म्हटलं आहे. जे साफ चूक आहे. या अहवालात झाडं असं म्हटलं आहे, झाडांना विमान धडकलं असं म्हटलं आहे. पण त्या ठिकाणी फक्त झुडपं आहेत तिथे विमान धडकलेलं नाही. अहवाल द्यायचा म्हणून दिला आहे बाकी काहीही या ठिकाणी दिसत नाही असंही रोहित पवार म्हणाले होते. आता त्यांनी ब्लॅक बॉक्सबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button