Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘पावसाळापूर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करावीत’; महापौरांचे प्रशासनाला आदेश

पुणे :  आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संभाव्य पूरस्थिती, नालेसफाई आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधा हे सर्वोच्च प्राधान्य असून कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

याबाबतचे पत्र महापौर मंजुषा नागपूरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार पुढील आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच शहरातील नाले सफाईसह पावसाळी वाहिन्यांची सफाईही येत्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करून या कामांची दैनंदिन नोंद क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ठेवून त्याचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत.

महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार, गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टीचा अनुभव लक्षात घेता, नदीकाठच्या वस्त्या आणि पूरप्रवण भागांतील धोका अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा –  माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान; ग्रामपंचायतींसाठी पाच कोटींचे पुरस्कार…

प्रशासनाने अशा भागांची ‘हॉटस्पॉट्स’ यादी अद्ययावत करून पाणी साचू नये यासाठी पंपिंग मशिनरी आणि अन्य आवश्यक उपाययोजना तातडीने सज्ज ठेवणे आवश्यक आहे. अशा पूरप्रवण भागांची आपण स्वत: पाहणी करणार असून संबंधित विभागप्रमुखांनी यावेळी उपस्थित राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत महापौर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ नयेत यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची अंतिम तारीख निश्चित करावी.

सध्या सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून रस्ते तातडीनं दुरूस्त करावेत अशा सूचनाही या पत्रात करण्यात आल्या आहेत. या कामांना प्रशासनाने प्राधान्य देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button