Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले’; पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

Pankaja Munde | परळीचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं. खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले, असं पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश..? काय दत्ताभाऊ..? खरं आहे की नाही? पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता..आले मी परत तिथेच..खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा     –        काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’!

माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेवत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button