Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“जुने कार्यकर्ते हे घर की मुर्गी ‘दाल बराबर’, बाहेरचे… “; नितीन गडकरी भाजपच्या वाढत्या इन्कमिंगवर स्पष्टचं बोलले!

Nitin Gadkari : भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. कालच एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते हे घर की मुर्गी दाल बराबर झाले आहेत. तुम्हाला बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो, अशा शब्दांत त्यांनी पक्षातील बाहेरून आलेल्या आयारांमाला चिमटा काढला.

कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वन टाइम इम्प्रूव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणेच्या प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलाी. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी भाजपच्या आतल्या संघटनात्मक पद्धतीवर उघडपणे या विधानातून नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –  हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार गंगा आरतीसाठी

पुढे ते म्हणाले, मी सध्या थेट संघटनात्मक जबाबदारीत नाही. पण एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, जर जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत राहिलो, तर पक्ष ज्या वेगाने वर जात आहे, त्याच वेगाने खाली येईल, हेही वास्तव असल्याचे गडकरींनी स्पष्टच सांगितले.

खरंतर भाजपने शत प्रतिशत भाजप ही घोषणा दिली आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी ग्राऊंड पातळीवरून ते थेट वरिष्ठ पातळीपर्यंत अनेक जण प्रयत्नशील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात जोरदार इन्कमिंग सुरूच आहे. यावरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. त्यांनी हे विधान भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोरच भर कार्यक्रमात केले आहे.

यावेळी मंचावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार अशोक मानकर आदी उपस्थिती होती. कळमेश्वर भागात डॉ. राजीव पोतदार सारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला लाभला. त्यांना मी कायम सांगायचो, दवाखान्याकडे लक्ष द्या.. मात्र त्यांनी दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून जनतेची कामे करत राहिले, असेही नितीन गडकरींनी या कार्यक्रमात त्यांची आठवण सांगत सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button