Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अजित पवार म्हणाले, ‘कायदे-नियम हे सर्वोच्च’

Minister Manikrao Kokate Resigns : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्यानंतर कालपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली. अखेर आज त्यांचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांनी स्वीकारला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या विरोधात शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात येत होती. विरोधकांनीही यावर रान उठवले होते. अखेर आज त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, “माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे.”

हेही वाचा –  ‘OTT’ प्लॅटफॉर्मला सेन्साॅर नाही.! माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण

कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले, सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button