Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण अटळ; अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा दावा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू असतानाच अजित पवारांचे निकटवर्तीय आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. अजित पवारांची अंतिम इच्छा पूर्ण होणार असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच एकत्र येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीबाबत माहिती नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यभरात विविध चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, पार्थ पवार यांनी गोविंदबाग येथील निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबासोबत सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेचा सस्पेन्स कायम असतानाच किरण गुजर यांनी मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा      :            जम्मू-काश्मीरमध्ये पहाटेच भूकंपाचे जोरदार धक्के ; रिश्टर स्केलवर ४.६ एवढी तीव्रता

अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, अशी माहिती किरण गुजर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘पुढील दहा ते अकरा दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होऊ शकते. २१ जानेवारीला अजित पवारांनी मला सांगितले होते की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विलीनीकरण केलं पाहिजे. त्याबद्दल चर्चाही सुरू आहे असं त्यांनी सांगितले होते, असा दावा गुजर यांनी केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा निर्णय पक्का झाला आहे. अजित पवारांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार आहे. ही प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल आणि याबद्दलची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात येईल, असं किरण गुजर म्हणाले.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या परिसरात अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही सर्वजण अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आहोत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं किरण गुजर यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button