Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“मी लवकरच भारतात येईन” ; ‘महान नेता’ म्हणत ट्रम्पकडून मोदींचे कौतुक, व्यापार कराराविषयी दिले ‘हे’ महत्वाचे संकेत

Trump on PM Modi :  गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादले, परंतु आता अमेरिकेचा सूर बदललेला दिसत आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात संवाद सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच व्यापार करारावर एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे जवळजवळ बंद केले आहे त्यामुळे भारतसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात होऊ शकते” असे देखील सांगण्यात आले.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी झालेल्या संभाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “सर्व काही खूप चांगले चालले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे जवळजवळ बंद केले आहे. ते (पंतप्रधान मोदी) माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आम्ही वारंवार बोलत असतो. मी लवकरच भारतात जाईन. पंतप्रधान मोदी एक महान नेते आहेत.” असे म्हणत त्यांनी भारतात येण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प पूर्वी भारताबद्दल बरेच कठोर दिसत होते, परंतु आता त्यांची भूमिका मऊ झाली आहे.

हेही वाचा –  मनोज जरांगेंचा झोपेत घात करण्याचा प्लॅन, एका मोठ्या नेत्याचा हात?; जीवे मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी

भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी, “दोन्ही देशांमध्ये चांगल्या चर्चा सुरू आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो. ” असे म्हटले आहे. दरम्यान ,ट्रम्प यांनी भारताला भेट देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रम्पच्या आधी, व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही पंतप्रधान मोदींबद्दल एक विधान केले.  दोन दिवसापूर्वी त्यांनी  सांगितले की, ट्रम्प भारत-अमेरिका संबंधांबद्दल खूप सकारात्मक आहेत आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर त्यांचा खोल विश्वास आहे. तिने पुढे म्हटले की ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी अनेक मुद्द्यांवर थेट चर्चा करतात.

ट्रम्पचा भारतासोबतच चीनबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या बैठकीनंतर, चीन आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. व्यापार सुरू झाले आहे आणि टॅरिफचा प्रश्नही काही प्रमाणात सुटला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button