Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकली, मेळाव्यातून घोषणा

पुणे | विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मेळाव्यात आपण भाजपमधून बाहेर पडणार असून तुतारी हाती घेणार असल्याचं सांगितलं.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा    –      ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा 

आपण निर्णय घ्यायचा आणि तो शरद पवारांना कळवायचा. त्यापुढचा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात मी जाणार नाही. ज्यावेळी या तालुक्यात राजकीय निर्णय झाले आहेत ते जनतेच्या आग्रहामुळे झाले आहेत असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निर्णय झाले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती आता होते आहे. १९९५ ला तुम्हीच आग्रह केला होता की बंडखोरी करा. त्यावेळी मी बंडखोरी केली. त्यावेळी जनतेच्या आग्रहामुळे आणि मतांमुळे मी निवडून आलो असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

त्यानंतर तुम्ही म्हणालात काँग्रेसमध्ये जा की काँग्रेसमध्ये जा. त्यानंतर तुम्हीच आग्रह केलात म्हणून २०१९ ला भाजपात गेलो. दुर्दैवाने ती निवडणूक जिंकता जिंकता हरलो. इंदापूर तालुक्याला अपयश पहावं लागलं. मागच्या १० वर्षांत ज्या ज्या ठिकाणी राडे झाले, समाजांमध्ये तेढ निर्माण झाली हे आपण पाहतोय. असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button