Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा शोधा’; महसूलमंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याबाबत येत्या २८ ऑक्टोबरला पुढील आढावा बैठक होणार असून त्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा इशाराही बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात केंद्र सरकारच्या ‘बाबू जगजीवनराम छात्र आवास योजना’ अंतर्गत वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासंबंधी बैठक झाली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, दूरदृश्य प्रणाली द्वारे सर्व जिल्हाधिकारी, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘व्यवसाय सुलभता धोरणामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणीसाठी मालकीची जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्यांनी तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी मोजणी शुल्क माफ करावे, अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी तसेच १० जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास विभागाच्या मालकीच्या जागा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या जागा हस्तांतरित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, अशी सूचनाही बावनकुळे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button