Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Eknath Shinde | राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे. मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा     –      रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारण्याचे आदेश

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button