एकनाथ शिंदे अथक परिश्रम घेतायत! पंतप्रधान मोदींच्या एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

eknath shinde birthday : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा आज (९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिंदे यांनी देशभरातून राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या जात आहे. इतकेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर यानिमीत्ताने पोस्ट केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पूज्य बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”
दरम्यान या शुभेच्छांनंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
“आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आपले स्नेहपूर्ण शब्द आणि आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. आपल्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे आणि महाराष्ट्रातही आम्ही आपण दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर पूर्ण वचनबद्धतेने पुढे जात आहोत. देशाबद्दल आपले समर्पण आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती असलेली आपली आत्मीयता आम्हाला निरंतर प्रेरणा देत राहील.
हेही वाचा – सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप ; क्वालकॉमच्या 2 एनएम चिपचे डिझाईन पूर्ण
आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनसेवेच्या आमच्या संकल्पावर ठाम राहू आणि एक समृद्ध तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये आपले योगदान देत राहू. आपल्या शुभ आशीर्वाद आणि सद्भावना यांच्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.”
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रदेशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणाच्या दिशेने आपण उल्लेखनीय काम कर आहात. गणपती बाप्पा आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो,” असे अमित शाह म्हणाले आहेत.




