Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा’; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची उभारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकामाधीन तसेच प्रस्तावित सहकार भवनाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. याबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात विविध जिल्ह्यात बांधकामाधीन व प्रस्तावित सहकार भवनसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ’; मंत्री अतुल सावे

सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, सहकार भवनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता व प्रशासकीय मंजुरीच्या प्रस्तावांबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी. सहकार भवनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर सहकारी संस्थांना एकाच छताखाली कार्यालयीन सुविधा आणि समन्वयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नियोजित आराखड्यानुसार आणि निश्चित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.

बैठकीत संबंधित विभागीय अधिकारी व जिल्हास्तरीय यंत्रणांनी सहकार भवनांच्या बांधकाम प्रगतीचे सादरीकरण केले. सहकार भवनांसाठी निधी उपलब्धता, तांत्रिक मंजूरी आणि कामांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button