Breaking News : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! राज्य शासनाचा ‘GR’ प्रसिद्ध!
प्रभागांमध्ये जागा वाटप नियमावली जाहीर : इच्छुक भावी नगरसेवकांनो लागा कामाला!

पुणे: राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने संबंधित ‘जीआर’ प्रसिद्ध केला आहे. शक्य असेल, त्या ठिकाणी चार सदस्यीय आणि तीनपेक्षा कमी नाही अशाप्रकारची वॉर्ड रचना निश्चित करण्यात येणार आहे. प्रभागांमध्ये जागा वाटपाची नियमावली निश्चित करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तशी पावले टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना केली होती. राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये निवडणूक प्रभाग किती सदस्यांचा असेल, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला. तसेच चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचा निर्देश दिला होता. यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात प्रभाग रचनेचे अधिकार सरकारने स्वत:कडे घेतले होते.यानुसार प्रभाग रचना पूर्ण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेवर राज्य सरकारकडून जीआर प्रसिद्ध केला आहे. प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
प्रभागांमध्ये जागांचे वाटप नियमावली PDF पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. महापालिका
GazetteSearch (20.05.2025) (प्रभागांमध्ये जांगाचे वाटप नियमावली)