Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारीचा हप्ता.. नवी अपडेट काय?

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता या योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय नेमका काय आहे? चला जाणून घेऊया…

राज्य सरकारने फेब्रुवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासाठी २७७ कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा –  राष्ट्रवादीत खळबळ..! सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला सुरुंग?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो.

ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेली नाही, त्यांनी ३१ मार्चपर्यंत ती नक्की पूर्ण करा, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळू शकतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button