Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

आजी-माजी पाच आमदारांचा प्रभाग भोसरी गावठाण राजकीय ‘केंद्रबिंदू’ 

ग्राऊंड रिपोर्ट : लांडे-लांडगे-गव्हाणे-फुगे-शिंदे यांच्यात होणार सामना

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वबळावर लढवतील, असे चित्र आहे. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’  च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत. (भोसरी गावठाण)

2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 53 हजार 67 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 4 हजार 683 इतकी अनुसूचित जाती आणि 828 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. 

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये शहरात भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे चारही नगरसेवक निवडून आले होते. प्रभागातील अ- गटातून भाजपाचे संतोष लोंढे यांनी 10 हजार 974 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या संतोष लांडगे यांचा पराभव केला होता. सध्या संतोष लांडगे आमदार महेश लांडगे यांच्यासोबत आहेत. ब- गटातून भाजपाच्या तिकीटावर लढलेल्या प्रा. सोनाली गव्हाणे यांनी 11 हजार 906 मते मिळवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या सोनम गव्हाणे यांचा पराभव केला होता. 

विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या त्यावेळी समर्थक असलेल्या भिमाबाई फुगे यांनी क- गटातून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि त्यानंतर आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.

शहराचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचा मुलगा ॲड. नितीन लांडगे यांनी ड- गटातून या प्रभागात निवडणूक लढवली होती. त्यांनी 10 हजार 231 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जालिंदर शिंदे यांचा पराभव केला होता.

विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, स्व. सोपानराव फुगे, स्व. मोतीराम पवार यांची निवासस्थाने आणि भोसरी गावठाण परिसर असल्यामुळे विधानसभा मतदार संघासह महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सदरचा प्रभाग हा राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू आहे. या प्रभागामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांची ताकद तुल्यबळ आहे. 

2017 च्या निवडणुकीत अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण- महिला आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. ओबीसी आणि सर्वसाधारण समाजाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. त्यामुळे मराठा आणि माळी कार्ड सर्वाधिक चालेल, असे चित्र आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. स्थायी समितीचे अध्यक्षपदी काम करताना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, कबड्डी संकुल उभारण्यात आले. फुटबॉल, हॉकी मैदान विकसित झाले. ‘फिर ॲक्वॅरिअम’चे काम प्रगतीपथावर आहे. स्ट्रॉम वॉटर लाईन सक्षम केले आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी साचण्याची समस्या सुटली आहे. रस्ते विकास, शाळा इमारत अशी कामे मार्गी लागली आहेत. आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल झाला आहे. भोसरीचे प्रवेशद्वारचे काम पूर्ण झाले. विकासकामांच्या जोरावर भाजपाचे चारही नगरसेवक निवडून येतील.
– संतोष लोंढे, माजी नगरसेवक. 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभागाचाच नव्हे, तर संपूर्ण शहराचा विकास झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, भोसरी गावचे प्रवेशद्वार अशी महत्त्वाची कामे झाली. प्रशासकीय काळात आणि भाजपा सत्ताकाळात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. प्रलंबित गार्डन आणि डीपी रस्त्यांची कामे झालेली नाहीत. गेल्या १५-२० वर्षांत दिग्गज प्रतिनिधीत्व करीत आहेत. पण, अद्याप काँक्रिटीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करु शकले नाही. ड्रनेज लाईनचे मेंटनन्स झाले नाही. मुलभूत सुविधांसाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे. अन्य गावांची ग्रामदैवत मंदिर आणि परिसर विकसित झाला, पण आमच्याकडे तसे दिसत नाही.
विराज लांडे, इच्छुक, राष्ट्रवादी. 

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button