कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे मोठ विधान; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताव वक्तव्य तसेच, विधान सभा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
कृषिमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच, मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल, तेव्हा ते बोलतील. असही यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा – दिल्लीच्या संसद भवनात ‘जय महाराष्ट्र’चा नारा; मराठी खासदारांनी निशिकांत दुबे यांना विचारला जाब
कोकाटेंचा वि़डिओ सभागृहाच्या आत घडलं असल्याने तो विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारित येतो. माझी आणि माणिकरावांची प्रत्यक्षात बैठक झाली नाही, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. माझी आणि त्यांची बहुतेक सोमवारी बैठक होईल. मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल, तेव्हा ते बोलतील. सरकारला ते भिकारी म्हणाले, याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे.
तसेच, राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झाले, बिजा झाले आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.





