सूरज चव्हाण यांच्यावर अजित पवार यांची कारवाई; लातूरमधील मारहाणीच्या प्रकरणानंतर राजीनामा घेण्याचे आदेश

लातूर : लातूरमध्ये घडलेल्या गंभीर आणि निषेधार्ह मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने तात्काळ कठोर पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा – कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? ‘पक्ष कठोर निर्णय घेईल’, तटकरेंचा कडक इशारा
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात सूरज चव्हाण यांचे नाव पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या मूल्यांविरोधातील कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा ठाम संदेश अजित पवार यांनी यानिमित्ताने दिला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाच्या शिस्तीबाबत अजित पवार यांनी दाखवलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.





