TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणविदर्भ विभाग

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मराठा आरक्षण आंदोलकांचा हल्ला

मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, कारवर दगडफेक

जालना : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना वेळीच ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कारवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते.

मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीतून विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि इतर आंदोलकांवर टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्यादेखील संविधानविरोधी असल्याची भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे. त्यावरून मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

नेमकं घडलं काय?

जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडॉ. गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले होते. यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताब्यावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक करत हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळा नंतर सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषण स्थळी रवाना झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button