Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार; मंत्री आदिती तटकरे

मुंबई | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

चर्चेदरम्यान मंत्री तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अनाथ बालकांच्या पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून नियमानुसार उपाययोजना करण्यात येतील. गर्भाशय मुखाच्या कर्करोग लसीकरणाबाबत आरोग्य विभागासोबत समन्वय साधून उपयुक्त असा उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने शासन राबविणार आहे.

हेही वाचा  :  पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या ११ जिल्ह्यात विविध उपयोजना राबविण्यात येत आहेत. कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येईल. मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात येईल. भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन ५००० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आजपर्यंत ही सर्वात मोठी मानधन वाढ आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button