breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस तक्रार, मारहाण केल्याचा आरोप

पुणे – भाजप नेत्या आणि कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेने मेधा कुलकर्णी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोथरुड भागातील रामबाग कॉलनीतला गणेश कुंज सोसायटीच्या समोर सुरू असलेल्या ऊसाच्या गुऱ्हाळावरून वाद झाल्याचे सांगितले जाते. सोसायटीमधील लोकांना या गुऱ्हालामुळे त्रास होत होता. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. हे गुऱ्हाळ चालवणाऱ्या दीपाली चव्हाण नावाच्या महिलेशी आणि तिच्या पतीशी त्यांची झटापट झाली.

हे ऊसाचे गुऱ्हाळ अनधिकृत जागेत होते. यामुळे सोसायटीतील नागरिकांना त्रास होत होता. तसेच, परिसरात डास वाढले होते. त्यामुळे हे गुऱ्हाळ हटविण्याची मागणी सोसायटीतील लोकांनी केला.दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी मात्र मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दीपाली चव्हाण चालवत असलेलं गुऱ्हाळ अनधिकृत असल्याचं आणि परिसरातील लोकांना त्याचा त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button