ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये २३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा तात्पुरता बंद!

निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाची तयारी

पिंपरी- चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.या कामांसाठी सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणताही खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा      :              दररोज पाणीपुरवठ्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज!

या कामांसाठी सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक २३/०२/२०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

तसेच या कामांचा परिणाम म्हणून दुसऱ्या दिवशी मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद कालावधीत नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.पाणीपुरवठ्यातील या तात्पुरत्या अडचणीसाठी नागरिकांनी समजून घेऊन मनपास सहकार्य करावे.

– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button