Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळे येथे दुर्दैवी अपघात: भरधाव ट्रकची धडक, महिलेचा मृत्यू; ट्रकचालक फरार!

रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी ट्रकचालकाचा शोध सुरू

पिंपरी-चिंचवड : पुनावळे येथील काटेवस्ती चौकाजवळ 30 जुलै 2025 रोजी दुपारी सुमारे 2.45 वाजता एक भीषण अपघात घडला. या अपघातात स्कुटीवरुन जात असलेल्या 33 वर्षीय महिलेला भारत बेन्ज ट्रकने धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला असून, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. रावेत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.

मृत महिला – समीना केशव कुंद्रा

मृत महिला समीना केशव कुंद्रा (वय 33 वर्षे) या पतीसोबत पुनावळ्यातील गायकवाड नगरमध्ये वास्तव्यास होत्या. त्या पियाजिओ कंपनीच्या अप्रिलिया एस.आर. 150 स्कुटीने (MH 12 QR 1101) केसरगंज रेस्टॉरंटमधून घरगुती कामासाठी जात होत्या. त्यावेळी 108 स्ट्रीट बिल्डरच्या ऑफिस समोर महिंद्रा कंपनीचा भारत बेन्ज ट्रक (MH 14 HG 7907) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत आणून ट्रकचालकाने त्यांच्या स्कुटीला जोराची धडक दिली. धडकेनंतर ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्यावर व कमरेवरून चाके गेली. त्यामुळे त्या जागीच गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड शहरात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

IPC कलम २८१ – सार्वजनिक मार्गावर धोकादायक वाहतूक, IPC कलम १०६ – सदोष मनुष्यवध, वाहन कायदा कलम १८४ – निष्काळजी आणि बेपर्वा वाहन चालवणे, कलम १३४/१७७ – अपघात झाल्यावर माहिती न देता पळ काढणे व नियमांचे उल्लंघन अशा नियमांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ट्रकचालकाचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने केला जात असून, नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ट्रकचालक फरार

अपघातानंतर संबंधित ट्रकचालक कोणालाही काहीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत केशव गुलाबसिंग कुंद्रा (वय ३६ वर्षे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ अंतर्गत कलम २८१, १०६ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button