ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी स्मशानभूमी येथील कचरा संकलन केंद्राचे होणार स्थलांतर!

भाजपा नगरसेवक सचिन तापकीर यांच्या मागणीला यश

– महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेला मंजुरी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी स्मशानभूमी परिसरात असलेल्या कचरा संकलन केंद्राच्या स्थलांतराचा महत्त्वपूर्ण निर्णय अखेर घेण्यात आला आहे. या संदर्भातील उपसूचना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली असून, यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाजपा नगरसेवक सचिन तापकीर यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत मोशी स्मशानभूमी परिसरातील कचरा संकलन केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याबाबत त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती.

हेही वाचा –  कागदांच्या ढिगाऱ्यात लपलेलं सत्य..; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ने हादरणार संपूर्ण व्यवस्था?

या मागणीची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने कचरा संकलन केंद्र स्थलांतराबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, सर्वसाधारण सभेत संबंधित उपसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबत आश्वासति केले आहे. या निर्णयामुळे मोशी परिसरातील रहिवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या निर्णयाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. महापालिका प्रशासनाकडून पुढील टप्प्यात नवीन ठिकाण निश्चित करून स्थलांतराची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील हा निर्णय स्वच्छता व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“मोशी स्मशानभूमी परिसरातील कचरा संकलन केंद्रामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. या केंद्रापासून अवघ्या २ किमी अंतरावर कचरा डेपो आहे. मग, या ठिकाणी संकलन केंद्राची आवश्यकता नाही. प्रशासनाचा खर्च होतो आणि अत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांनाही त्रास होतो. हा प्रश्न आम्ही सातत्याने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला. अखेर सर्वसाधारण सभेत उपसूचनेला मंजुरी मिळाल्याने हा परिसर लवकरच स्वच्छ व आरोग्यदायी होईल, याचा आम्हाला आनंद आहे.

— सचिन तापकीर, नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button