मोरया शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
शिक्षण विश्व: गेली 53 वर्ष ज्ञानदानाचे काम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मोरया शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. मोरया शिक्षण संस्था गेली 53 वर्ष ज्ञानदानाचे काम करत असून विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मोरया शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील इयत्ता बारावीचा निकाल कला शाखा- 100 टक्के, वाणिज्य -98.03 टक्के, सायन्स – 98.63 टक्के याप्रमाणे लागला आहे.
हेही वाचा : ‘संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!’ : किरण माने
दरम्यान कला शाखेतील शिंदे तेजल नितीन हिने 91.67 टक्के, दाभाडे सुहास सुनील 90.33टक्के, काटे शारदा स्वप्नील 84.17 टक्के, वाणिज्य शाखा आहेर माधवी अविनाश 87.70 टक्के, पवार आर्यन संजय 86.67 टक्के, विज्ञान शाखेत दराडे ऋतुजा सुनील 83.83 टक्के, गायकवाड संजना अशोक 80.67 टक्के, निपुणिज शुभम मंगेश 80.67 टक्के, कदम अनुष्का सुनील 79.67 टक्के या प्रमाणे लागलेला असुन 20 टक्के मुले विशेष प्राविण्य, 61 टक्के मुले प्रथम श्रेणी तर 55 टक्के मुले द्वितीय श्रेणीत पास झाली आहेत.