ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या टीमने घेतली महापौर रवि लांडगे यांची भेट

पिंपरी | अभिनेत्री तथा खासदार कंगना रानौत निर्मित “भारत भाग्य विधाता” हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तापडिया, चित्रपट निर्मात्या बबीता अशीश्वाल तसेच अभिनेत्री गिरिजा ओक आणि स्मिता तांबे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांची आज सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान चित्रपटाच्या निर्मितीमागील संकल्पना, कथानक आणि समाजाभिमुख विषयांबाबत चर्चा करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यावेळी महा मेट्रो पीसीएमसीच्या ब्रँड ॲम्बेसेडर संगीता तरडे तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

हेही वाचा

भारतीय संघाला मोठा धक्का! श्रेयंका पाटील टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर; ‘अन्कॅप्ड’ खेळाडूची संघात एन्ट्री

महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘भारत भाग्य विधाता’सारखे चित्रपट समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे कार्य करतात. अशा आशयघन आणि प्रेरणादायी चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचतो. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button