ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग ८ मध्ये ‘राष्ट्रवादी’चा शंखनाद; इंद्रायणी नगरातील श्री गणेश मंदिरात प्रचाराचा शुभारंभ

मिशन- PCMC : नागरिकांना विश्वासाची ताकद, विकासाची हमी

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा भव्य शुभारंभ शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.

इंद्रायणी नगर येथील सेक्टर २ मधील श्री गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून उमेदवारांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. सकाळी ९:३० वाजता गणरायाची आरती करून प्रचाराला सुरुवात झाली. या वेळी दोन्ही गटांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा     :          प्रभाग २८ मध्ये अनिताताई काटे यांचा थेट संवाद; नागरिकांचा विश्वास दृढ 

“प्रभाग आठचा विकास, हाच आमचा ध्यास” अशी घोषणेने परिसर दणाणून गेला. गणेश मंदिरातून सुरू झालेली प्रचार रॅली प्रभागातील विविध भागांत पोहोचली. प्रचाराचा मार्ग आणि जनसंपर्क : धार्मिक स्थळांचे आशीर्वाद: श्री साई मंदिर, दुर्गामाता मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर येथे दर्शन घेऊन उमेदवारांनी जनसंपर्क साधला. सोसायट्यांमध्ये संवाद: पूर्ण सोसायटी आणि आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रांमध्ये पदयात्रा काढली. व्यापाऱ्यांशी चर्चा: मिनी मार्केट आणि राजवाडा परिसरात व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत उमेदवारांनी परिवर्तनाचे आवाहन केले.

विकासावर भर…

प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना पायाभूत सुविधा, पाणीप्रश्न आणि प्रभागातील सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली असून, प्रभाग ८ मधील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभाग ८ चा विकास हे फक्त आमचे ध्येय नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची आमची प्रतिज्ञा आहे. आपली साथ आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आपण एकत्र पावल टाकले, तर प्रभागात खरी प्रगती नक्की दिसेल.

– तुषार सहाणे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 8.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button