मिशन- PCMC : ‘दादां’चा शब्द अन् विकासाची साथ!
प्रभाग क्र. ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचाराचा झंझावात!

पिंपरी-चिंचवड | “परिवर्तनाचा बुलंद आवाज… विजयी निर्धार!” या घोषणांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ७ सध्या अक्षरशः दुमदुमून गेला आहे. पुणे जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ‘विजयी निर्धार सभे’नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रचाराला प्रचंड गती मिळाली आहे. ही सभा केवळ निवडणुकीची घोषणा न राहता, प्रभागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा एल्गार ठरली आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारांनी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ‘अष्टप्रधान संकल्पना’ मांडली आहे. या विकास आराखड्यात पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रोजगारनिर्मिती, सुरक्षा, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण या आठ प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.
शुद्ध व समान पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते व उद्याने, स्वच्छ व हरित प्रभाग, युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना, आत्मनिर्भर महिलांसाठी आर्थिक बळ, परवडणारी हायटेक आरोग्यसेवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा हे या संकल्पनेचे ठळक पैलू आहेत.
हेही वाचा : मातंग समाज संघटनेचा भाजपाला बिनशर्त जाहीर पाठिंबा
घरोघरी पोहोचले ‘घड्याळ’; मतदारांचा उदंड प्रतिसाद
माजी नगरसेविका सुरेखाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कॉलनी, शांतीनगर तसेच परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये होम-टू-होम प्रचार राबवण्यात येत आहे. उमेदवारांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
“आम्ही केवळ आश्वासने द्यायला आलो नाही, तर अजितदादांनी दिलेला विकासाचा वचननामा घेऊन आलो आहोत. हा जाहीरनामा पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीचा खरा आराखडा आहे,” अशी ठाम भूमिका उमेदवारांनी मांडली.
महिला वर्गाचा खंबीर पाठिंबा..
प्रचारादरम्यान महिलांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘घड्याळ’ चिन्हाचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास अनेक ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केला. अजितदादांच्या जाहीरनाम्याचे वाटप करत विकासकामांची सविस्तर माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये सुरू असलेल्या या जोरदार प्रचारामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने विजयाच्या दिशेने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.





