भाजपकडून प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रचाराचा दणदणीत शुभारंभ
मिशन–PCMC : ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरातून प्रचाराला सुरुवात

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ (गव्हाणे वस्ती–भोसरी गावठाण) येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला. भोसरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात दर्शन व आशिर्वाद घेऊन ‘मिशन–PCMC’ अंतर्गत प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘बलशाली भारत आणि विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागातून विकासाची पायाभरणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितीन लांडगे, संतोष लोंढे, प्रा. सोनाली गव्हाणे आणि राणी पठारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास आमदार महेश लांडगे यांचे बंधू तथा उद्योजक कार्तिक सर लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा : स्नेहा कलाटे यांच्या नागरी संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि नागरी सोयी-सुविधांबाबत भाजपची विकासाभिमुख भूमिका मांडण्यात आली. प्रभाग क्रमांक ७ मध्ये शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी आणि शांतीनगर परिसराचा समावेश असून, या सर्व भागांचा समतोल विकास साधण्याचा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात आला.
विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार – पुन्हा भाजपाचा ठाम निर्धार
हिंदुत्वाच्या सांस्कृतिक मूल्यांवर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारत भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प केला आहे. मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, सुरक्षितता, स्वच्छता आणि सुशासन या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा भाजपाचा ठाम निर्धार आहे. परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारा हा विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार पुन्हा एकदा जनतेसमोर मांडत भाजपाने विश्वासार्ह नेतृत्व आणि स्थिर प्रशासन देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
“प्रभाग क्रमांक ७ चा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
– ॲड. नितीन लांडगे, उमेदवार, प्रभाग-7.





