Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव दाभाडे, चिखली पोलीस ठाणे अव्वल!

मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रम; पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची कामगिरी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्यांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १०० दिवसांच्या कार्यप्रणाली सुधारणा मोहिमेत ही महत्त्वाची कामगिरी नोंदविण्यात आली.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे विभागाचे उपायुक्त संदीप डोईफोडे, वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर यांनी विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन गुन्हे व मुद्देमाल निर्गती, कार्यालयीन स्वच्छता, रंगरंगोटी, अभ्यागत कक्ष व्यवस्था, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांवर मूल्यमापन केले. त्याअंतर्गत भोसरी आणि देहूरोड पोलीस ठाण्यांना द्वितीय, तर दिघी व पिंपरी पोलीस ठाण्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.

हेही वाचा   :  PCMC | आमदार शंकर जगताप यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त चौबे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशीच गुणवत्ता कायम ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button