विद्यार्थ्यांच्या कौशल्याला मिळाले हक्काचे व्यासपीठ
शिक्षण विश्व: फ्युजन आर्क क्लबच्या वतीने स्टॅम्प डिझाईन स्पर्धेचे आयोजन

पिंपरी चिंचवड : एमआयटी आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालय, आळंदी येथे दिनांक 26 जुलै 2025 रोजी फ्युजन आर्क क्लबच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील टपाल तिकिटे डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधांशू सक्सेना, प्राध्यापक (प्रॅक्टिस), एमआयटी एसीएस कॉलेज, आळंदी-पुणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कामाचे मूल्यमापन केले.
हेही वाचा – ट्रम्प प्रशासनाचा भारताला मोठा धक्का! रशियन तेल खरेदीमुळे ५० टक्के टॅरिफची घोषणा
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. बी. बी. वाफारे, असोसिएट डीन डॉ. सुनील महाजन, विभागप्रमुख बरीन शेख, डॉ. पद्मावती उंदाले आणि क्लब समन्वयक निकिता देोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
महाविद्यालयाच्या विविध विभागांमधून एकूण 16 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहपूर्वक सहभाग घेऊन आपापल्या क्रिएटिव्ह स्टॅम्प डिझाईन्स सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता देवरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. सिद्धी वाघचौडे यांनी केले.
वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर्स, सर्व डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकउत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.





