Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

खेळ, नृत्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमात विद्यार्थी रमले!

शिक्षण विश्व : संत साई शाळेत बाल दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड: संत साई इंग्लिश मिडियम हायस्कूल भोसरी येथे बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलं म्हणजे आनंद उत्साहाचे प्रतीक असून त्यांना प्रेम वेळ आणि प्रोत्साहन देणे ही सर्वांची जबाबदारी आहे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बाल दिन साजरा केला जातो. त्यांना लहान मुलांप्रती विशेष प्रेम असल्याने हा दिवस मुलांचा सण म्हणून ओळखला जातो. शाळेत आगमन झाल्यावर शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले. वर्ग शिक्षकांनी वर्गांची आकर्षक सजावट केली होती. सुरांच्या तालावर नाचत मुलांनी आनंदाने वर्गात प्रवेश केला. शिक्षकांनी हसतमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

हेही वाचा –  थंडीची लाट असली तरी पावसाचंही मळभ दाटलेलच; हवामान विभागाचा अंदाज काय?

मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकन्या कांगणे यांनी केले तर आभारप्रदर्शन नम्रता ओव्हाळ यांनी केले.

मुलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी गाणी म्हटली नृत्य सादर केले तसेच जादूचा कार्यक्रम आणि बाउन्सी मिकी माउसचा आनंद लुटला. लहानग्यांच्या हातावर नैसर्गिक रंगांनी टॅटू काढण्यात आले. मुख्याध्यापक ढवळेश्वर यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या नियोजनात शाळेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर विश्वस्त पायल ढवळेश्वर भारती ढवळेश्वर तसेच संजय अनार्थे मनोज वाबळे आणि मालन लिगाडे यांचे सहकार्य लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button