Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर कडक नियंत्रण

आर.एम.सी. प्लांट आणि बांधकाम स्थळांवर कठोर उपाययोजना आदेशित

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने सर्व आर.एम.सी. (Ready Mix Concrete) प्लांट, बांधकाम स्थळे आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांसाठी कडक आदेश जारी केले आहेत.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार धूळ आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी ठरवलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणं अनिवार्य आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा –  ‘प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत छंद जोपासावेत’;उपमहापौर शर्मिला बाबर

शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) मोजणी नोंदींनुसार सध्या शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम (AQI १०० ते १५०) श्रेणीत आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड मनपा सर्व संबंधित आस्थापनांना धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याचे आवाहन करत आहे.

पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, “सर्व आर.एम.सी. प्लांट धारक, बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना सील केली जाईल आणि उपाययोजना पूर्ण न झाल्यास ती बंद ठेवली जाईल.” महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत नियमित तपासणी केली जाणार असून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे सर्व आर.एम.सी. प्लांट, बांधकाम स्थळे आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांनी धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी ठरवलेले उपाय तात्काळ राबवावेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करणे अपरिहार्य आहे, आणि गरज भासल्यास आस्थापना सील करण्याची पावलं उचलली जातील.”

– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button