Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक! विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकास अटक

पिंपरी- चिंचवड महापालिका शाळेतील घटना

पिंपरी चिंचवड : शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका संशयीत शिक्षकाला अटक केली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली.

संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५१, रा. कृष्णानगर, चिखली, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणीसोबत अश्लील चाळे केले. तसेच वॉशरुमला डोकावून पाहून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

हेही वाचा –  तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य आत्मसात करा

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७४, ७८, ११५(२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ९ (एफ), १२, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

संबंधित घटनेबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईची ‘एफआरआय’ कॉपी आज प्राप्त झाली. या घटनेबाबतचा सदर शाळेतील मुख्याध्यापकांचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

-किरणकुमार मोरे,सहाय्यक आयुक्त, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button