शिवसेना महिला आघाडीला देणार ‘बळ’
शिवसेना महिला आघाडीच्या आढावा बैठकीत चर्चा

महापालिका निवडणुकांमध्ये महिला आघाडी राहणार केंद्रस्थानी
पिंपरी | प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना महिला संघटन बळकट करण्यावर भर देत आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघावर ‘फोकस’ करण्यात येणार आहे. महिला आघाडीला बळ देऊन पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवणे. महिलांच्या सक्रिय सहभागातून आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद आमदार मनीषा कायंदे, ज्येष्ठ नेत्या मीना कांबळी, प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुलभा उबाळे, आणि पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे उपस्थित होत्या.
बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघावर महिला आघाडीच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चारही लोकसभा मतदारसंघांचा सखोल आढावा घेऊन महिला नेतृत्व बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
हेही वाचा : महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये शिवसेना आक्रमकपणे काम करत आहे. आगामी काळात याच माध्यमातून शिवसेनेचे संघटन मजबूत केले जाणार आहे. यामध्ये महिला आघाडीची बांधणी, सदस्य नोंदणी अभियान व आगामी निवडणुकांच्या रणनीती यावर लक्ष केंद्रित करून करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षाने महाराष्ट्रभर राबवलेल्या “सदस्य नोंदणी अभियान” यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात आला. विशेषतः पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्थांशी संलग्न कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी वाढवण्याचा कार्य आरंभ करण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शिवसेना महिला आघाडी म्हणजे पक्षाचा आत्मा आहे. जिल्हा, तालुका व शहर पातळीवर महिला आघाडीची रचना अधिक प्रभावीपणे उभारून, पुणे जिल्ह्याला पक्ष संघटनात अग्रस्थानी नेण्याचा ठाम निर्धार या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.21 विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीची नव्याने संघटन बांधणी,पक्षाच्या धोरणांचा प्रचार व गावा-गावात कार्यकर्त्यांना सक्रिय करणे,महिला नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी विशेष कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र व संवाद दौऱ्यांचे आयोजन,स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर शिवसेना महिला आघाडीच्या नेतृत्वात कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे.
– सुलभा उबाळे, शिवसेना उपनेते.